Tag Archive | ऋणानुबंध

मानवी जीवन ५

आपण आत्ता पर्यंत पहिले कि जीवनात बाह्य घटकांकडून आपण जे काही शिकतो ते अडचण म्हणून प्राप्त जीवनात कसे कार्य करते. ह्या आधी आपण पहिले कि आपल्या देहाची धारणा आणि आपले आचार विचार उच्चार

ह्यांचा आपल्या प्राप्त जीवनात कश्या प्रकरे प्रभाव पडतो आणि कित्ती पर्यंत आपले जीवन हे त्यांच्याकडून ठरवले जाते. पण ह्या सर्व घटकान मध्ये एक गोष्ट नक्क्कीच सारखी होती आणि ती म्हणजे कि हे सर्व घटक थोड्या

जास्त प्रमाणत अश्या प्रकारे कार्यान्वित झाले ह्याचे मूळ कारण हे आपण मध्येच होते, पण असे काही घटक आहेत का जे खरोखरच आपण control किंवा define करू शकत नाही ? आणि असले तर ते कोणते

आहेत? ह्याचा थोडासा आपण समजण्याचा आत्ता पप्रयत्न करूया.

मानंसाच्या जीवनात अडचणी येतात ह्याला बरेचदा तोच स्वत कारण असला तरी काही काही वेळा अये पण नक्कीच घडते कि एखाद्या होणार्या त्रासा मध्ये प्रत्यक्ष त्याचा सहभाग काहीच नाही पण केवळ त्यावेळी तोः तिथे

उप्स्तीत आहे म्हणून किंवा केवळ काही कारण परत्वे त्याचे व्यक्तिगत वा पारिवारिक वा सामाजिक हितसंबंध असल्याने तोः तश्या प्रकारच्या प्रसंगाला समोर जातो किंवा त्याला तश्या प्रकारची अडचण सहन करावी लागते.

जीवशास्त्र असे सांगते कि माणूस जन्माला येतो म्हणजे जो गर्भ मातेच्या उदरात आहे त्याची वाढ पूर्ण होते मग तो जन्म घेतो पण वाढ पूर्ण  होणे आणि वाढ परिपूर्ण होणे ह्यात खूप फरक आहे. वाढ पूर्ण होते म्हणजे आपण त्या

देहाचे अवयव हे पूर्ण स्वरूपात कोणत्या पण विसंगती सकट दिसतात, पण वाढ परिपूर्ण तेंव्हाच होते जेंव्हा तोः जन्माला आलेला जीव हा देहिक आणि अत्त्मिक दृष्ट्या परिपूर्ण होतो, आत्मिक दृष्ट्या परिपूर्ण होणे म्हणजे

नक्की काय असे आपणास नक्की वाटू शकते, तर देहाचे दोन प्रमुख भाग आहेत प्रामुख्याने,  १  म्हणजे देहिक ज्यात ज्ञानेद्रीये, कर्मेंद्रिये, पंचतन्मात्रे ह्यांचा समावेश होतो, आणि अम्तिक म्हणजे जन्मला येताना येणारे पाच

प्रधान ऋणानुबंध, चैतन्य, बुद्धी, मन , चित्त, अहंकार, ह्यातील बुद्धी मन चित्त आणि अहंकार ह्या अवस्था आहेत. त्या आपण अनानुभावू शकतो पण त्यांचे तरीदेखील वर्गीकरण आत्मिक स्थितीशी केले कारण ह्या गोष्टी कायम

आत्म्याशी किंवा चैतन्य शक्ती शी जोडलेल्या आहेत. आणि वर देहिक वर्गीकरण बघताना जे आपण पंचज्ञानेद्रीये, पंचकर्मेंद्रिये, आणि पंचतन्मात्रे पहिली आहेत तती आपल्या देहिक आणि आत्मिक शक्तीस जोडून ठेवण्यचे

आणि  दोन अवस्थांमधून energy exchange करायचे कार्य करत  असतात.

ह्यामध्ये सर्वात प्रधान कार्य आहे ते म्हंजे ऋणानुबंधाचे  कारण जन्म घेताना जे पांच ऋणानुबंध आत्म्याबरोबर जोडले जातात त्यावर पुढच्या जीवनाची पूर्ण development ठरणार असते.  आपल्या जीवांचे कार्य कारण आणि

भाव तीनही अवस्था ह्या पूर्णपणे रुनाबंधांवर अवलंबून असतात. आपल्या जीवनात आत्मिक शक्ती किंवा चैतन्यशक्ती जी आहे तिचे कार्य ह्या रुनानुबंधांवर सर्वस्वी अवमालाबून असते जीवनात येणाऱ्या सर्व अडचणीचे

मुल्करण हे ह्या पांच रुनानुबंधांमध्ये आहे . इतके हे महत्वाचे असतात. ह्यातील काही ऋणानुबंध निर्माण होण्यास कधी आपण कारण असतो तर कधी आपण कारण नसतो पण ह्याचमुळे त्यांचे कार्य थांबते असे नाही. आपल्या

प्राप्त जीवनात ते अव्याहत पाने चालूच असते.

पण हे ऋणानुबंध म्हणजे नक्की काय आहे? ह्या शब्दची आपणा फोड केली तर दोन वेगळे शब्ध मिळतील ऋण आणि अनुबंध. ऋण म्हणजे सध्या सोप्या भाषेत कर्ज  किंवा केलेली मदत. कर्ज आपण कधी घेतो जेन्वा आपणास

एखादी गोष्ट करायची आहे, किंवा हवी आहे आणि काही कमतरतेमुळे आपण ती घेण्यास किंवा करण्यास असमर्थ असतो तेंव्हा आपण दुसर्या एखाद्या व्यक्ती कडून कर्ज घेतो आणि ती अपूर्ण अशी गोष्ट पूर्ण करतो.

व्यावहारिक जगामध्ये जेंव्हा एखादी वस्तू विकत घेण्यासाठी आपणास पैसे कमी पडतात तेंव्हा आपण काय करतो, आपण एखाद्या वित्तापेधीवर जातो आणि कर्ज घेतो  आणि नंतर installments मध्ये ती रक्कम आपण

त्या बँकेला परत करतो त्याला आपण म्हणतो कि मी बँकेकडून कर्ज घेतले  पण आपणास बँकेकडून हे कर्ज्जा का घ्यावे लागले कारण जेवढी रक्कम आपल्याला आपली अडचण भागावाण्यासाठी त्या क्षणी हवी होती तेवढी

एकरकमी आपल्याकडे नवती पण ती बँकेकडे होती म्हणून आपण बँकेकडे गेलो रक्कम कर्जाऊ घेतली आणि अडचणीचे निवारण केले आणि त्या घेतल्या रक्कमेइतकि रक्कम आपण बँकेला परत केली व तसेच अडचण

असताना आपली अडच  बँकेने भागवली म्हणून बँकेने आकारलेले व्याज पण आपण दिले. हे झाले व्यवहारामध्ये. इथे ऋणाचा संबंध काय, तसा प्रत्यक्ष दर्शी काहीच नाही पण अप्रत्यक्षपणे नक्की आहे जो आपण नंतर बघूया.

तसेच ऋणानुबंध ह्या शब्धात जो ऋण हा शब्ध आहे तोः पण तसाच आहे.  ह्यामध्ये घडणारी क्रिया पण तसीच आहे पण मुख्य फरक कोणता असेल तर तो असा आहे कि वरच्या व्यावहारिक उदारणामध्ये आपण हे पहिले कि

अपन्ल्याला पैशाची अडचण होती ती अडचण आपण बँकेकडून सोडवली कारण ती materialistic गोष्टीची होती, पण जेंव्हा अशी अडचण  उभी राहते जेथे पैसा अडका किंवा इतर व्यावहारिक गोष्टी नाही तर

माणसाची किंवा एखाद्या ईश्वरीय शक्तीची मदत घेऊनच ती सोडवली जाते जिची आपण परतफेड मुद्दल+व्याज अश्या स्वरूपात किंवा इतर कोणत्या पण व्यवहारीक स्वरूपात करू शकत नाही तेंव्हा ते ऋण म्हणून जीवनात

कार्यान्वित होते म्हणजेच ऋण म्हणजे असे कर्ज जे आपण एखाद्या व्यक्तीकडून किंवा शक्ती कडून अश्या स्वरूपात घेतो ज्याची आपण कोण त्याच व्यावहारिक गोष्टीनी परिपूर्तता करू शकणार नाही. त्याची परिपूर्णता

करायचे निकष हे  आपल्या व्यवहारिक जगाच्या कोणत्याच मानांकनात बसत नाहीत परंतु अश्या मदतीची किंवा कर्जाची किंवा  मदतीची गरज ही आपल्याला आपल्या आर्थिक, प्रापंचिक, पारमार्थिक, आधिदैविक

आधिभौतिक, अध्यात्मिक अश्या सर्व प्रकारच्या जीवन प्रकारात लागते आणि ती तेवढ्या सहजपणे  कोणतीपण अवास्तव किंवा अयोग्य किंवा वैयक्तिक लाभाची अपेक्षा न ठेवता समोरच्या व्यक्ती, शक्ती कडून केली पण

जाते.

व्यवहार आणि ऋण ह्यात हाच मोठा फरक आहे. जो व्यवहार आहे त्यात समोराच्या व्यक्तीला किंवा संस्थेला किंवा शक्तीला तुमच्या कडून काहीतरी in return मिळण्याची अपेक्षा असते आणि त्या अपेक्षेतून ते तुम्हाला

मदत करण्यास तयार असतात. उदा. बँकेकडून घेतलेले कर्ज .म्हणजे जेथे समोरच्या माणसाला मदत ही बुद्धि माध्यमातून तारतम्याच्या कसोटीवर पारखून दिली जाते तेथे तोः व्यवहार आहे. आणि जेथे समोरच्या माणसाला

केवळ मदत करायची इच्छा जाहली किंवा तोः माणूस आपल्याकडे मदतीसाठी आल्यावर आपण वयैक्तिक स्वार्थ साधण्य पेक्षा त्याच्या अडचणीसाठी शक्य तेवढे मदतकार्य करायचे भावनेतून म्हणजेच मनाने सांगितल्याप्रमाणे

बुद्धीतून केले कार्य म्हणजे व्यवहार नाही तर ऋण होय.

म्हणजेच तसे पाहता ऋण म्हणजे कर्ज पण होणार नाही तर ऋण म्हणजे निस्वार्थ बुद्धीने केलेली आणि घेतलेली मदत.

आत्ता प्रश्न असा ह्येतो कि अशी मदत एखाद्या व्यक्तीला करायची इच्छा का होते? आपल्या घरात लहान मुले असतात तसीच बाजूच्या घरात पण असत्तात पण आपल्या मुलाला साधा ताप जरी आला तरी आपली काळजीने जीव

जाताची वेळ येते, कुठे नेऊ, कुठे जाऊ, कोणत्या डॉक्टर कडे जाऊ, ओणते औषध देऊ, कोणत्या औषधाने बरे करू, लवकर का बरा होत नाही इत्यादी अनेक विचारांनी आपला जीव पार कासावीस होतो पण तेच शेजारच्या

घरातील मुलगा आजारी पडल तर आपण एवढे अस्वस्थ होत नाही, केवळ दिवसातून दोन तीन वेळा चौकशी करतो आणि शांत बसतो असे का होते? साधे सरळ उत्तर आहे कि आपल्या मुलामध्ये आणि आपल्या मध्ये

नात्याच्या किंवा भावभावनेचा एक तरल असा बंध असतो ज्यामुळे आपण आपल्यामुलाची किंवा घरातील व्यक्तीची इतक्या तिडकीने काळजी करतो पण तसा बंध हा शेजारच्या मुलासाठी नाही म्हणून वाटणार्या काळजीचे

प्रमाण खूप कमी असते. हे जसे घरातील लोकांबद्दल असते तसेच आपल्या परीवाराव्यातीरिक्त काही अजून लोकां बद्दल पण नक्कीच वाटते परिवारातील नसून पण त्यांना नकळत आपण परिवाराचा एक सदस्याम्ह्णून आपण

treat करत असतो कारण तसाच  बंध आपल्या मध्ये आणि त्या लोकांमध्ये असतो, हाच ऋणानुबंध ह्या शब्द्चा दुसरा भाग अनुबंध.

वर नमूद केल्याप्रमाणे आपणस जी निस्वार्थ मदत करण्याची इच्छा एखाद्यास हिओते किंवा अत्यंत प्रतिकूल अश्या वेळेत आपण सहजपणे एखाद्याच व्यक्ती कडे वळतो कारण आपल्या मध्ये आणि त्या व्यक्ती मध्ये हा अनुबंध

असतो. ह्यामुळे त्या व्यक्तीस तिच्या कळत व नकळत आपणास मदत करण्याची प्रवृत्ती होते, म्हणजे आपण म्हणतो कि माझे आणि त्या व्यक्तीचे नक्कीच काहीतरी ऋणानुबंध होते म्हणून त्या व्यक्तीने मला मदत केली आहे.

म्हणजे आपल्या लक्षात असे येईल के वर जो विषय आपण बघतो आहोत तोः विषय केवळ जीवनात अत्यंत महत्वाचा असा नसून तो विषय आणि त्या विषय परत्वे असणारे कार्य हे भावनिक म्हणजेच अत्यंत तरल अश्या

स्वरूपात कार्य करतात आणि हे ऋणानुबंध कधी कधी आपले जीवन खूप सुंदर तरी करतात किंवा पूर्नाजीवन यातनामय तरी करतात. तसेच आपण पहिले कि जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी येतात ज्याचे वर्गीकरण

आपण प्रामुख्याने आधिभौतिक, अधिदैविक, आणि अध्यात्मिक असे करतो आणि ह्या अडचणींना जरी रुनानुबंधातील विषय कारणीभूत असले तरी असलेल्या अडचणी प्रमाणे ह्या रुनानुबंधांचे वर्गीकरण पांच रुनानुबंधात केले

आहे जे खालीलप्रमाणे,

जन्मकर्म, जन्मजन्मांतर, मातृ-पितृ, इतरेजन.

ह्या अश्या पांच रुनानुबंधातून माणसाचे जीवन घडत असते. त्याचे पुढचे जीवन ठरत असते आणि त्याचा जीवनावर पडणार परिणाम हा प्रत्येक वयाच्या वेळी आणि अडचणीच्या वेळी देखील वेगवेगळा असतो. त्यासाठी त्या

त्या ऋणानुबंधाबद्दल यथायोग्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण जीवनात सर्वात महत्वाचे काही असेल तर ते म्हणजे जन्मकर्मा आणि जन्माकार्मातील विषय जे आजचे प्राप्त जीवांचे कारण आहेत आणि ह्या

जन्माकार्मातील जे विषय ठरवले गेले ते इतर ४ रुनानुबंधांमुळे. तेंव्हा आपल्या लक्षात येईल कि ह्यांचे जीवनात काय महत्व असेल ते.

आपल्या गुरुनी आपणस शिकवेल कि कर्माची व्यक्त अवस्था म्हणजे जीवन. पण त्या कर्माची अव्यक्त अवस्था ही ह्या रुनानुबंधात आहे कारण जे कर्म आपण जीवन म्हणून देह आणि बुद्धी माध्यमातून व्यक्त करू ते कर्म धारण होनार ते ह्या रुनानुबंधातूनच. कारण कर्म व्यक्त होणे म्हणजे आचार विचार आणि उच्चार ह्याचे एकरूपत्व करून कार्य संपन्न करणे आणि जे विषय ह्या रुनानुबंधात आहेत तेच विषय देह माध्यमाच्या ठिकाणी आत्मिकतव्तातून रुजू झाले आहेत आणि त्यानुसार बुद्धी आणि मनाचे कार्य घडते जे आपल्या अचात्र विचात आणि उच्चारातून देह प्रकट करतो आणि जे कर्म म्हणून धारणा होते. म्हणजेच ह्या सर्वांचा कित्ती सूक्ष्मतम असा परिणाम आपल्या जीवनात आहे हयचे अवलोकन आपणच करावे.

हे पांच ऋणानुबंध आपल्या जीवनात काय काय अपेक्षित किंवा अनपेक्षित कार्य करतात ते  पुढच्या भागात बघूया.